Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!?

कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!?   कुठे हरवल्या त्या शेणामातीच्या भिंती... कायमच्या... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो वाटायचा पाटा... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती मातीची चूल... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो चुलीतला धूर... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती वाटेवरची धूळ... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती गोठ्यातली गुरं... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती दंगा करणारी पोरं... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? #Irshalvadi 🥺 #Irshalwadi Landslide 😓 #Bhavpurna Shradhanjali 🙏 ©  डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील M.B.B.S., M.D. (Community Medicine) दि. २५ /०७/२०२३.

तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!!

''तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!! "काय बे... नाचला का लेका आत्ता...!?" तो म्हणाला... "नाही...!" मी म्हणालो... काऊन बे...!? काऊन नाही नाचला...!? तर ते ७-८ वर्षांचं पोरग म्हणालं... "मी मुसलमान नाही ना...!?" आत्ता थोड्या वेळापूर्वीचं माझ्या मित्राच्या घराखालून मिरवणूक जात होती. कदाचित मोहरम जवळ आल्यामुळे सवारी घेऊन मिरवणूक वाजत गाजत सवारी बसवायला जात होती. घराखालून मिरवणूक पुढे गेली आणि मी माझ्या घरी परत जायला खाली आलो... आणि वरील प्रसंग घडला. " थोड्या वेळासाठी  काळजात चर्रर्रर्र झालं माझ्या...!!! आणि मग ह्या गोष्टीचा विचार करत करतचं मी घरी परतलो... लहाणपणी माझ्याही गावात मोहरम आला की सवारी बसायची. ७-८ वर्षाचाचं असेल मी तेंव्हा... सिंदखेड आणि लिंगमपेठ अशा दोन्ही भागात सवारी बसायची. आणि ती सवारी हमेशा हिंदू व्यक्तीच्याचं घरी बसायची. ह्याचे कारण काय होते हे मला अजूनही माहिती नाही किंवा ते माहिती करून घ्यायचा मी प्रयत्नही कधी केला नाही. गावातील सर्व हिंदू-मुस्लिम आणि बौद्धधर्मीय लोक मिळून ह्या मोहरममध्ये स

याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...!

याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! तुम्ही प्रवासाला जात असता, भटकंती करत राहता, तुम्ही वाचत असता सतत काहीतरी, जगण्याच्या हाका पडत असतात तुमच्या कानावर कधीमधी, कधी तरी देत असता तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! स्वत:चं मन न मारता, तडजोड न करता जगता तुम्ही, मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही स्वीकारता तुम्ही, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! सवयीेंचे गुलाम बनत नाही तुम्ही, रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालत नाही तुम्ही, कधीमधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत असता तुम्ही, चुकून कधी वाट चुकत असता तुम्ही, परक्या अनोळखी माणसांना भेटत असता तुम्ही, त्यांच्याशी हितगुज करत असता तुम्ही, अंगावर चढवत असता नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! छातीत धडधडत असतं तुमच्या, तुमचं पॅशन काय हे सतत आठवत राहत तुम्हाला, भावनांचा अतिरेकी कल्लोळ जाणवत असतो तुम्हाला, आतल्या आत, तुटत असत पोटात, येत राहत इतरांसाठी आणि स्वतःसाठीही तुमच्या डोळ्यात पाणी, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! या कामात मन रम

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला... "हा दादा... बोल ना..." मी म्हणालो. गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!? हो दादा... का...!? काय झालंय? गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...! काय...!!!??? गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...! तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला... गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!? Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...! त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो. तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घा