Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

लातूरचं शाहू कॉलेज, गंजगोलाईतला निलंग्याचा जिरा राईस आणि गांधी चौकातली इडली...!

लातूरचं शाहू कॉलेज, गंजगोलाईतला निलंग्याचा जिरा राईस आणि गांधी चौकातली इडली...! सन २०१० ची गोष्ट... दहावीत महत्प्रयासान चांगले टक्के पडल्यामुळे लातूरच्या शाहू कॉलेजला एडमिशन मिळाली होती. पप्पांनी पहिल्याच दिवशी येऊन मुक्कावर बॉईस होस्टेलला एडमिशन घेऊन दिली आणि लातूरमधील अकरावी - बारावीचा अविस्मरणीय प्रवास सुरु झाला. कौन्सलिंग मध्ये Crop Science च्या तुकडीत प्रवेश झाला आणि पप्पा दुपारच्याचं गाडीने गावाकडे परतले. दहा-पंधरा दिवसातचं पहिली युनिट टेस्ट झाली आणि मला जेमतेम ९१ मार्कचं मिळाले. जेमतेम म्हणण्याचं कारण कि माझ्या पुढच्या वीसेक पोरांना ९५ च्या वर मार्क होते. मी म्हणलं...  पन्या लेका... चाल तुवं बोऱ्या बिस्तर बांधून परत आपल्या गावाकडं... तुवं कायी भजन जमत नाही इथं...!" लयी जाम टेन्शन आलं होत... भौ...! पण मग पुन्हा संध्याकाळी होस्टेलला गेलो अन दुसऱ्या तुकडीच्या एका मित्रानं समजून सांगितलं... म्हणला… आबे बस उगा... चुत्या हाईस का बे... मला इथं ८० चं पडलेतं… मी काय करू मग... बस उगा अभ्यास कर... ताण नको घेऊ... पुढच्या परीक्षेत घासून अभ्यास कर भावा... तू हमखास टॉप १० मध्ये येतूस... आ