Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

मी बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे का/कसा वळलो...?

मी बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे का/कसा वळलो...? सप्टेंबर २०१३ चा शेवटचा आठवडा... भयाण टेन्शन... काहीच सुधरत नव्हतं... काहीच कळत नव्हतं कि माझ्या आयुष्यात काय चाललंय... कशाचा काही थांगपत्ता नव्हता... काहीच समजत नव्हतं आणि काहीच उमजत नव्हतं... कशाचंच भान मला उरल नव्हतं... कारण फक्त एक कि... मी फर्स्ट इयर MBBS ची फायनल एक्सामची Supplementary अर्ध्यातच सोडून घरी निघून आलो होतो... result तर फिक्स होता... इयर डाउन... आयुष्यात पहिल्यांदाच नापास झालो होतो... का झालो...? कसा झालो...? तो भाग वेगळा... कि मी आयुष्य फारच हलक्यात घेतलं होतं... आणि त्याचेच हे परिणाम होते... पण ह्यातून बाहेर पडायचं कसं...? हाच सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता... सात एक दिवसांच्या भयाण शांततेनंतर एक दिवस घरातलं पप्पांचं कपाट उघडलं... वरच्या खाण्यात काही पुस्तक होती... ज्यांना मी कित्येकदा बघूनही कधीच स्पर्श केला नव्हता... त्यातली दोन पुस्तक उघडली... एक बुद्ध आणि त्यांचा धम्म जे स्वतः बाबासाहेबांनी लिहिलं होत... आणि दुसरं बाबासाहेबांचं धनंजय किर ह्यांनी लिहिलेले चरित्र... कारण स्पष्ट होत... मला माझ्या तात्कालिक पर