Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

मैत्री-विवाह

मैत्री-विवाह आज माझ्या आंतरजातीय मैत्री विवाहाला १ वर्ष पूर्ण झाली! होय मैत्री विवाहच...! मुद्दामच प्रेमविवाह हा जोडशब्द नाही लिहिला...! असो... ह्या मागील एका वर्षात बुद्ध-शिव-फुले-शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बऱ्याच गोष्टी बोलून-करून मला विचार करण्यास भाग पाडले! जसे की, प्रणितकडे किंवा माझ्या घरच्यांकडे लोकांचे बोलणे यायचे की, का तुम्ही दुसऱ्या जातीची मुलगी केली? सत्यशोधक विवाहच का केला? लग्नात नातेवाईकांचा मान-पान नाही केला! जोडा जमत नाही! न शोभणारी मुलगी केली! (मुळात मी लठ्ठ आहे!) नवरा डॉक्टर आहे तर मुलगी पण डॉक्टरचं करायला पाहिजे होती! न कमावती मुलगी केली... इत्यादी, इत्यादी! आणखी यादी बरीच मोठी आहे! या सर्व गोष्टी पाहता मला प्रश्न पडायला लागले की चांगले आचरण, निस्वार्थ मन ह्याला काहीच किंमत नाहीये का? (नातेवाईक आणि ते कोण असतात ते तिऱ्हाईत 4 लोक्स! त्यांच्यासाठी तर नाहीच असते वाटते!) लग्नानंतर बरेच जवळचे लोक मला म्हणायचे की थोडी बारीक हो... मला वाटायचं काळजीपोटी म्हणतात! (तसेही काळजीपोटी म्हणणारे आहेतकी म्हणा! नाहीत असे नाही!)

शिवशक्ती आणि भिमशक्ती

 "शिवशक्ती आणि भिमशक्ती: महार(बौद्ध/नवबौध्द) व मराठा(कुणबी) समाजातील अंतर कायम ठेवून ब्राह्मणवादाला खतपाणी घालणारी कावेबाज संकल्पना" महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा व गैरमराठा खास करून महार समाजाचा किंवा शेड्युलकास्टचा नेता एकत्र आला की शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली असे म्हणण्याचा मूर्खपणा सर्रास चालु आहे. यामध्ये शिवशक्तीचा प्रतिनिधी मराठा नेता असतो व महार समाजाचा (शेड्युलकास्टचा) नेता भिमशक्तीचा प्रतिनिधी असतो. हा माहोल असा काही रंगवला जातो की पाहणाऱ्यास असे वाटते किंवा पटवून दिल्या जाते कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त मराठा लोकांसाठी फक्त मराठा लोकच बरोबर घेऊन काम केले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शेड्युलकास्टसाठी फक्त शेड्युलकास्टचेच लोक बरोबर घेऊन काम केले होते. एरव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे स्वराज्य निर्माण केले होते आणि बाबासाहेबांनी सर्वच भारतीयांसाठी संविधान लिहिले होते असे ओरडून सांगणारे पण या वातावरणात दिसेनासे होतात. हे सर्व पाहून एक भिषण प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे शिवशक्ती व भीमशक्ती मधे विभागलेला महाराष्ट्र फुले - शाहु - आंबे