Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

Choose your Lady Wisely; She represents you! ('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)

  Choose your Lady Wisely; She represents you!💞 ( 'व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...) एक साधारण कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्ती बराक ओबामा जेंव्हा पहिल्यांदा संयुक्त राज्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते... तेंव्हा संयुक्त राज्य अमेरिकेच्या पहिल्या महिला म्हणून त्यांच्या पत्नी मिशेल ओबामांचा त्यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध होत होता. आणि त्या फोटोसोबत एक वाक्य देखील सर्व सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये लिहून येत होते: Choose your Lady Wisely; She represents you! खरंय...! अपूर्वासोबत लग्नानंतर लगेच ह्या गोष्टीची अनुभूती मला झाली...! पण त्यापूर्वी मला ह्या वाक्याबद्दल फक्त थोडीफार समज होती कारण आमचा प्रेमविवाह!!! तोही आंतरजातीय! आणि एकदा ठोकर लागल्यावर तर माणूस ताकसुद्धा फुकून पीत असतो म्हणे! म्हणून लगेच वाचकाने ह्या लेखाच्या शिर्षकाचा अर्थ नकारात्मक घेऊ नये! नाहीतर आमच्या घरात भांडे वाजायला काही उशीर नाही! आणि तशी भांडी वाजायला पण हवीत म्हणा कारण ते म्हणतात ना " तुझं-माझं जमेना...अन तुझ्या वाचून करमेना! " असो... अपुर्वा संगिता विजय पोलासवार म्हणजेच माझी अप्पू...! माझी हमस