Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो पेटून उठेल...!

"गुलामाला 'तु गुलाम आहेस' असे सांगा; म्हणजे तो बंड करून उठेल...!" #डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेबांनी जनता नावाचे पाक्षिक सुरू केले होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाला होता. त्याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे जनता पाक्षिकाचे संपादक झाले. जनता पाक्षिकाचे पुढे ३१ ऑक्टोबर १९३० ला 'जनता साप्ताहिक' झाले. साप्ताहिक जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून "गुलामाला 'तु गुलाम आहेस' असे सांगा; म्हणजे तो बंड करून उठेल" हे वाक्य होते. "आये मम्मे... हे काय आहे गं...? हे बघ ह्याच्यात काय लिहिलं...? तू शूद्र आहेस म्हणून लिहिलं...!" 'बह्याड' आहेस का गं...! काही पण बोलतं का? कुठे लिहिलं दाखव...? हे बघ...! हा... हा... हा... हा...!!! माय... हालकट कुठंच कि ते बामन... काही पण लिहिते की...? आपल्याच घरी येत जात राहते... खाते पिते अन् असं लिहिते की माझ्या कुंडलीत...? आन इकडे ती कुंडली...!  असं म्हणून माझ्या मम्मीने ती कुंडली टर्र टर्र फाडली... आणि माझ्या डोळ्यासमोरचं जाळ