Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...! एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती. असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकान

जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे...

जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे... २१ व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट... "देखो २००० जमाना आगया" हे आमिर खानचं मेला पिक्चरमधील गाजलेलं गाणं त्यावेळेस टीव्हीवर 'चित्रहार आणि छायागीत' मध्ये हमेशा लागायचं... आणि "मेला" पिक्चरसुद्धा शुक्रवारी रात्री ९:३० वाजता बऱ्याचवेळा दूरदर्शनवर लागायचा... साधारण ६-७ वर्षांचा असेल मी तेंव्हा... त्यावेळी गावातील इतर मुलां-मुलींप्रमाणे मी देखील सिंदखेड ह्या माझ्या नाल्याकाठच्या गावात हसत-खेळत बेफिकीर बागडायचो... दुनियादारीशी  माझा  अजूनतरी तरी तसा संबंध आला नव्हता ... आधीच मराठवाड्यातलं गाव अन त्यात आमच्या गावात असलेली पांढरीची जमीन म्हणजे दुष्काळात तेरावा महिना... त्यावेळेस पावसाळ्यात पाऊस आल्यावर साधारणतः डिसेंबर- जानेवारीपर्यंत पाण्याची चणचण जाणवायची नाही. पण फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरु झाल्यामुळे गावात पाण्याची वानवा जाणवायला लागायची. त्यानंतर आमच्या गावात पाण्यासाठी एकच उपाय होता... तो म्हणजे आमच्या गावातील नाला... माझ्या गावाची ठेवण सुद्धा विशिष्ठ अशीच आहे. गावाभोवती नाला यू आकाराचा आहे. गावाला नाला गोल फिरक