मैत्री-विवाह
मैत्री-विवाह
आज माझ्या आंतरजातीय मैत्री विवाहाला १ वर्ष पूर्ण झाली!
होय मैत्री विवाहच...! मुद्दामच प्रेमविवाह हा जोडशब्द नाही लिहिला...!
असो... ह्या मागील एका वर्षात बुद्ध-शिव-फुले-शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बऱ्याच गोष्टी बोलून-करून मला विचार करण्यास भाग पाडले! जसे की, प्रणितकडे किंवा माझ्या घरच्यांकडे लोकांचे बोलणे यायचे की, का तुम्ही दुसऱ्या जातीची मुलगी केली? सत्यशोधक विवाहच का केला? लग्नात नातेवाईकांचा मान-पान नाही केला! जोडा जमत नाही! न शोभणारी मुलगी केली! (मुळात मी लठ्ठ आहे!) नवरा डॉक्टर आहे तर मुलगी पण डॉक्टरचं करायला पाहिजे होती! न कमावती मुलगी केली... इत्यादी, इत्यादी! आणखी यादी बरीच मोठी आहे!
या सर्व गोष्टी पाहता मला प्रश्न पडायला लागले की चांगले आचरण, निस्वार्थ मन ह्याला काहीच किंमत नाहीये का? (नातेवाईक आणि ते कोण असतात ते तिऱ्हाईत 4 लोक्स! त्यांच्यासाठी तर नाहीच असते वाटते!)
लग्नानंतर बरेच जवळचे लोक मला म्हणायचे की थोडी बारीक हो... मला वाटायचं काळजीपोटी म्हणतात! (तसेही काळजीपोटी म्हणणारे आहेतकी म्हणा! नाहीत असे नाही!) पण नंतर जाणीव झाली की हे ते माझ्या काळजी पोटी न बोलता मला लेकरू होणार नाही ह्यासाठी बोलत आहेत! (त्यातही काळजी आहेच म्हणा!) पण वंशाचा दिवा आणि पणती वगैरे हीच का स्त्रीची किंमत! ह्या काळात अभ्यास कर आणि नोकरीला वगैरे लाग असे म्हणणारेही भेटले म्हणा... पण बोटावर मोजण्यावढेचं!
ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत... म्हणजे वाचणाऱ्याला अगदी कंटाळा येईल!😅
परंतु वरती संदर्भ दिलेल्या लोकांनी महापुरुष पुस्तकातच (कोण जाणे पुस्तकातही वाचलेत की नाही की?) न वाचता त्यांचे विचारही मस्तकात घालावे! सध्यातरी... हीच एक इच्छा आहे माझी!
पण ह्या एका वर्षात माझ्या नवऱ्याचा मानसिक आणि भावनिक आधार कायमच माझ्यासोबत होता. आणि तो आयुष्यभरासाठी राहीलचं! ह्यात मला मुळीच शंका नाही.
एवढ्या सगळ्या गोष्टी पार करून आम्ही सुखी संसाराचे एक वर्ष पार पाडलेचं की! तरी आयुष्यात आणखी बऱ्याच गोष्टी बघ्याच्या आहेत आणि संयमाने घ्यायच्या आहेत.
तुझ्यासोबत आयुष्य खरंच फार सोपं वाटतं... प्रणित!
❤️
Love You... Pranit Urmila Sanjay Patil
सोबतचं म्हातारे होऊ...!🥰
Date: 15/06/2021
© अपूर्वा संगिता विजय पोलासवार
B.Sc. Agriculture
Your writing is as good as your eloquence. There are many things that I have learnt from this blog. Happy Maitree_Vivah Anniversary to you Pranit sir and Apoorva mam💙
ReplyDeleteThanks Dear...!
DeleteAll the best for bright future Apurva and Dr Pranit... lovely couple 💑
ReplyDeleteThanks!
Deleteग्रेट जोडी आहे तुम्हा दोघांची
ReplyDeleteमंगल परिणय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा🥳🥳🙏🙏🙏
Thanks!🌻
ReplyDeleteDogha pan matare hoe paryant Asach Aanandi Raha..my best wishes for u both.
ReplyDeleteThank You...!
Delete👌👌👍
ReplyDeleteछान... काही गोष्टींना पाठीशी घालून पुढे जायचा प्रयत्न कर.. नकारात्मकता नको कोण बद्दल ही.. सर्वान सोबत आपण जसे आहोत तशाच पद्धतीने राहायचं बोलायचं आणि वागायचं सुद्धा..
ReplyDeleteएक लक्षात ठेव सारख्या व्यवसायातले लोक पण आयुष्यभरासाठी एकत्र राहू शकत नाहीत.. एक आयएएस आणि दुसरा पण आयएएस असणारे ते टिना दाबी हे उदाहरण आहे.. नात कोणाचं आहे हे महत्वाचं नाही ते नात कसं आहे , त्या नात्यात गोडवा कसा आहे , हे फार महत्वाचं आहे, नुसतं घर असून चालत नसतं तर त्या घराला घरपण देणारा भाव तसा त्यात दरवळत राहावं लागतं.. आंदण जगता आलं पाहिजे असा घर असलं पाहिजे आणि तू त्या पाईक आहेस याची खात्री मात्र नक्कीच आहे..
बाकी छान लिहिली पोस्ट
लग्नाला बोलवल नाहीस पण्या...
ReplyDeleteAt this time society will be of only materialistic thinking, it is no longer the same love emotion, its value is now decreasing.
ReplyDelete👌❤️
ReplyDeleteया संधर्भात एकदम सर्व गोष्टी या माझ्या मनातल्या आहें.... या सर्व गोष्टी ला बरेच जण अनुभवतात पण... हे सर्व शब्दात मांडले त्याला.... सलाम 👍👍👍
ReplyDelete👌
ReplyDeleteवैद्यक महत्वाचं मंन्जे एकमेकाले सहचर हुन खंबिरपणानं साथ हाच हाये खरा पुरावा माणुस असण्याचा तो फक्त पुऱ्या ताकतीनं आचरणातून दाखवा लोक्स कंपनी ले हेच सदिच्छा ्
ReplyDeleteअप्पु छान लिहल मस्त
ReplyDelete