कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!?

कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!?

 

कुठे हरवल्या त्या शेणामातीच्या भिंती...

कायमच्या...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवला तो वाटायचा पाटा...

कायमचा...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवली ती मातीची चूल...

कायमची...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवला तो चुलीतला धूर...

कायमचा...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवली ती वाटेवरची धूळ...

कायमची...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवली ती गोठ्यातली गुरं...

कायमची...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवली ती दंगा करणारी पोरं...

कायमची...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


कुठे हरवला तो भरलेला गाव...

कायमचा...

परत कधीच न गावण्यासाठी...!?


#Irshalvadi 🥺

#Irshalwadi Landslide 😓

#Bhavpurna Shradhanjali 🙏


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि. २५ /०७/२०२३.

Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. superb dr saheb

    ReplyDelete
  3. Khup Chan👌👌

    ReplyDelete
  4. Jabardast Sir ji 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मैत्री-विवाह

Choose your Lady Wisely; She represents you! ('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)

शिवशक्ती आणि भिमशक्ती