मी बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे का/कसा वळलो...?

मी बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे का/कसा वळलो...?


सप्टेंबर २०१३ चा शेवटचा आठवडा... भयाण टेन्शन... काहीच सुधरत नव्हतं... काहीच कळत नव्हतं कि माझ्या आयुष्यात काय चाललंय... कशाचा काही थांगपत्ता नव्हता... काहीच समजत नव्हतं आणि काहीच उमजत नव्हतं... कशाचंच भान मला उरल नव्हतं...


कारण फक्त एक कि... मी फर्स्ट इयर MBBS ची फायनल एक्सामची Supplementary अर्ध्यातच सोडून घरी निघून आलो होतो... result तर फिक्स होता... इयर डाउन... आयुष्यात पहिल्यांदाच नापास झालो होतो... का झालो...? कसा झालो...? तो भाग वेगळा... कि मी आयुष्य फारच हलक्यात घेतलं होतं... आणि त्याचेच हे परिणाम होते... पण ह्यातून बाहेर पडायचं कसं...? हाच सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता...


सात एक दिवसांच्या भयाण शांततेनंतर एक दिवस घरातलं पप्पांचं कपाट उघडलं... वरच्या खाण्यात काही पुस्तक होती... ज्यांना मी कित्येकदा बघूनही कधीच स्पर्श केला नव्हता... त्यातली दोन पुस्तक उघडली... एक बुद्ध आणि त्यांचा धम्म जे स्वतः बाबासाहेबांनी लिहिलं होत... आणि दुसरं बाबासाहेबांचं धनंजय किर ह्यांनी लिहिलेले चरित्र... कारण स्पष्ट होत... मला माझ्या तात्कालिक परिस्थितीतून बाहेर पडायचं होत... आणि तीच पुस्तके निवडण्याचं कारण म्हणजे एवढं तर माहित होतच कि बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलाय आणि बाबासाहेबांचं सर्व आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त संघर्ष... सांगायचा मुद्दा एवढाच कि बुद्धिस्ट कुटुंबात जन्म घेऊनही मी बुद्ध आणि बाबासाहेबांसोबत अनभिज्ञच होतो...


...त्यानंतर अधाश्यासारखी मी दोन्ही पुस्तक सकाळ-संध्याकाळ असं आलटून-पालटून वाचून फक्त ५ दिवसात संपवून टाकली... त्यातून मी काय बोध घेतला... कसा घेतला... कसं वाचलं... ह्याची उत्तर एखाद्या पुढच्या लेखात सविस्तर देईल... पण त्या दिवसापासून एक गोष्ट पक्की लक्षात आली कि दुःख आहे... दुःखाला कारण आहे... दुःख मुक्तीचा मार्ग आहे... आणि आपल्याला त्यावर चालणं देखील आहे... असं नाही कि ती दोन्ही पुस्तक वाचल्या वाचल्या माझ्या सर्व अडचणी दूर झाल्यात... आणि माझे सर्व प्रश्न सॉल्व्ह झालेत... पण माझ्या अधोगतीतून प्रगतीचा आलेख तेंव्हापासून सतत उंचावत गेला आणि आज दहा वर्षानंतर M.B.B.S. आणि M.D. (Community Medicine) संपवून सध्यातरी Plateau स्तरावर आहे... ह्याचा अर्थ असा नाही कि आयुष्यात आता सर्वच मिळवलयं...

आयुष्य आता तर सुरु झालंय... पण माझ्या जडणघडणीत जेवढा वाटा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे  बुद्ध आणि बाबासाहेबांचा होता, आहे  आणि राहील... तो सर्व ह्या दोन पुस्तकांमुळे... आणि त्यातील गोष्टींना मी माझ्या आयुष्यात अंगिकारल्यामुळेच...


परंतु बुद्धांची आणि माझी पहिली पुस्तकरुपी ओळख मी सहावीला असतानाच गुरुवर्य दादा केळुस्कर ह्यांच्या बुद्धांवरील चरित्ररूपी पुस्तकातून झाली होती. पण ती ओळख लहानपणीच्या असमंजस्यपणामुळे केवळ नाममात्र आणि माहितीपुरतीच राहिली... आणि परत ती ओळख नव्याने बाबासाहेबांमुळे त्यांच्याच बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पुस्तकातूनच झाली आणि तीही कायमस्वरूपी... ज्यामुळे माझं आयुष्य कायमस्वरूपी ढवळून निघालं... आणि मी बाबासाहेबांचा कायमस्वरूपी आजन्म ऋणी झालो... आणि बुद्ध आणि बाबासाहेबांबरोबरचा तो प्रवास आजतागत चालू आहे आणि पुढंही चालूच राहणार... अगदी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यन्त...


सांगायचं तात्पर्य एवढंच कि मी फक्त बौद्ध कुटुंबातील आहे म्हणून बुद्धांकडे नाही वळलो... त्याला देखील कारण होते... कारण मला दुःखातून बाहेर पडायचे होते... स्वार्थच म्हणा... पण त्यानंतर कित्येक मित्र आणि मैत्रिणींना मी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे... आणि त्यात काही प्रमाणात यशस्वी देखील झालोय म्हणायला हरकत नाही... यशस्वी म्हणजे फुल नाही तर फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे काही प्रमाणात ते मित्र आणि मैत्रिणी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत किंवा तसा प्रयत्नतरी  करत आहेत... त्याचादेखील अनुभव परत कधी सविस्तर लिहीन...


तूर्तास... आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतींस मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या आयुष्यात बुद्धरूपी प्रकाश देण्यासाठी त्यांचे सर्वस्वी आभार मानतो...


" बा भिमा... आमच्या असण्याचं आणि स्वाभिमानी जगण्याचं सर्वस्वी कारण तूच आहेस... आयुष्यात असा एकही दिवस जात नाही कि जेंव्हा तुझी आठवण येत नाही... आमच्या आयुष्यातील सर्वच चांगल्या गोष्टींसाठी आम्ही कायम तुझ्या ऋणात राहू आणि तू दिलेल्या मार्गावर चालण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि वाचून मोठे होऊ...!" 


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि. ०६/१२/२०२२

Comments

  1. खूप छान सर, तुमचे प्रयत्न आणि समाजाशी प्रामाणिक पणा आम्ही बघितला आहे, सविस्तर लिहिलेल वाचायला आवडेल. जय भीम

    ReplyDelete
  2. You are very nice person
    Mr. Pranit

    ReplyDelete
  3. Pudhil vatchalis mnapasun shubheccha keep it up beta

    ReplyDelete
  4. 👍👍


    Namo Buddhay......!!!!!



    Jay Bheem.....!!!!

    😊😊

    ReplyDelete
  5. अप्रतिम मांडणी

    ReplyDelete
  6. खुप छान दाजी... अतिशय सरळ आणि सविस्तर भाषेत लेख लिहीला..... 👌👌

    ReplyDelete
  7. Very nice 👍 All the Best

    ReplyDelete
  8. Ekdam bhari na bhawa💞👍

    ReplyDelete
  9. Nice sir Dr. Pranit sir 💐 💐

    ReplyDelete
  10. नमो बुद्धाय जय भीम सर 💙✒️🙏

    ReplyDelete
  11. अप्रतिम!👌

    ReplyDelete
  12. Very good all the best

    ReplyDelete
  13. Dr. Parnit is very generous and down to earth person

    ReplyDelete
  14. खूपच छान ...अप्रतिम लेखन🙏

    ReplyDelete
  15. You are one of the best writer. Nice🌹

    ReplyDelete
  16. Super, motivational 👌👌👌👌

    ReplyDelete
  17. अप्रतिम लिखाण....स्वतः सोबत वास्तविक परिस्थिती भासते आहे.

    ReplyDelete
  18. खूपच छान 👍👍👌

    ReplyDelete
  19. 👍👍 खुप छान

    ReplyDelete
  20. खूप छान सर आपल्या जिवनातील अनुभव सांगीतल्या बद्दल 🙏🙏

    ReplyDelete
  21. Nice 👍👍

    ReplyDelete
  22. अप्रतिम लेखन👍🙏

    ReplyDelete
  23. Such a motivational, Pranit 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मैत्री-विवाह

Choose your Lady Wisely; She represents you! ('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)

शिवशक्ती आणि भिमशक्ती