आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...?

आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...?

In a famous 1955 interview with Jonas Salk, Edward Murrow asked who owned the polio vaccine patent. Jonas Salk's reply: “Well, the people, I would say. There is no patent. Could you patent the sun?

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईत ओसंडलेल्या ज्या प्रचंड जनसमुदायाची जी एकमेव कृष्णधवल चित्रफीत आपण आज बघतो ती कशी चित्रित झाली आणि कोणी केली असेल ह्याचा कोणालाच साधा विचारही आला नसेल. मलाही आला नव्हता. कधीच नाही...! परंतु काल फेसबुकवर संगम कांबळे सरांची दलित मित्र मा. नामदेवराव व्हटकर ह्यांच्याबद्दल एक पोस्ट वाचली. क्षणार्धातच डोळे पाणावले... आणि विचारांच एकच काहूर डोक्यात माजलं...

आता निश्चितच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि पहिला English मधील जोनास साल्क ह्यांचा परिच्छेद आणि दुसरा बाबासाहेब व नामदेवराव व्हटकर ह्यांच्याबद्दलचा परिच्छेद ह्यात काय साधर्म्य आहे? किंवा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र मांडण्याचा काय संबंध?

तर मुद्दा असा आहे कि आजकाल फेसबुकच्या आभासी समाजात (Virtual Society) एक तथाकथित (So Called) पेटंटधारी जमात तयार झाली आहे. ह्या जमातीचे सदस्य No Doubt सृजनशील असतात. सुंदर चारोळ्या, कविता करतात. काही आकर्षक व आवडण्याजोगे परिच्छेद लिहितात. इतके कि त्यांना Share करण्याचा मोह इतरांना आवरता येत नाही. आणि त्याच मोहात एखाद्याकडून ती पोस्ट share करताना कॉपी-पेस्ट होते. आणि त्या ओघात त्या व्यक्तीकडून त्या तत्सम कवी किंवा लेखकाचे नाव अनासायासे share होत नाही. किंवा ती पोस्ट कुठून तरी अज्ञात नावाने कॉपी-पेस्ट होऊन आलेली असते... आणि आपण ती सहजपणे share करतो. किंवा एखाद्याला क्रेडिट द्यायचे लक्षात राहत नाही किंवा तसं करायचं कळत नाही. मग ह्या जमातीचा एखादा सक्रिय कार्यकर्ता उठतो आणि त्याची पोस्ट किंवा चारोळी किंवा वाक्य त्याला क्रेडिट न देता share करणाऱ्याला काहीही एक मागचा-पुढचा विचार न करता ट्रोल करत सुटतो... तेही पातळी सोडून. मग त्या पुढच्या व्यक्तीने कितीही जीवाचा आकांत करून किंवा बेंबीच्या देठापासून ओरडून सांगूनही कि मी हे जाणून-बुजून नाही केलंय, ह्या मुर्खाला त्या व्यक्तीच काही एक खरं वाटत नाही. कारण ह्या व्यक्तीला मीच कसा शहाणा आणि चतुर बिरबल आहे हे सिद्ध करायचं असत. मग पुढच्या व्यक्तीला वाटेल ते बोलायचं... चोर... Pirate... खोटारडा... आणि असंच घाणेरड्या प्रकारचं आणखी काही तरी एखाद दुसरं दूषण द्यायचं... बस्स फक्त लेबल लावायची दुसऱ्यांना... आणि पुढच्या व्यक्तीला Un-Friend करायचं आणि त्यानंतर त्यांच्यासोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट्स काढून त्याला परत ट्रोल करत FB वॉल वर भटकायचे. आणि त्यात जर ह्याच जमातीच्या एखाद्या त्याच्या समविचारी निब्बीने त्याच्या कंमेंट्स जर का लाईक केल्या... तर सोने पे सुहागा... हा निब्बा लगेच ढगात जातो... आणि पुन्हा हे निब्बा आणि निब्बी मिळून त्या व्यक्तीला ट्रोल करत ह्यांच्या "फ्रेंड्स ओन्ली" नावाच्या बंदिस्त FB वॉल वर बोंबलत फिरतात कि आम्ही ह्याचा कसा गेम केला?


आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...? तुला तुझ्या सृजनशीलतेचा एवढा माज कशाला? कुठून येता तुम्ही? आमच्यातलीच ना तुम्ही...!? जर एखाद्याने तुमचे विचार share केलेत तर काय बिघडलं ह्यात एवढ...! अरे... भाई तू तर खुश व्हायला पाहिजे कि साला चला.... कुठूनतरी का होईना आपले विचार Viral होतायेत...! आणि एवढा Ego किंवा भिती कशाची? ही एवढी Insecurity का? आज ना उद्या त्या Viral गोष्टीच मूळ समोर येईलच कि लेका... तसही चंद्र, सूर्य आणि सत्य जास्त काळ लपून राहत नाहीच मुळी... तुमच्या विचारांचं क्रेडिट तुम्हाला मिळणारच आहे...! पण त्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा करून आणि पातळी सोडून पुढच्याला ट्रोल करण्याची काही एक आवश्यकता नाही...! तुम्ही सामंजस्याने आणि नम्रतेनं सांगितलं तर पुढची व्यक्ती तुमचं Deu क्रेडिट तुम्हाला नक्कीच देईल...! आणि नाही दिले तर तुम्ही तुमचे सृजनशील विचार खुशाल पेटंट करा...!


जोनास साल्क ह्या जगविख्यात शास्त्रज्ञाने पोलिओच्या लसीच पेटंट घेतलंच नाही किंवा त्याला घेता आलं नसेल कदाचित... किंवा काही इतर कारण असेल. पण पोलिओ लसीची मालकी कुणाची ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने पोलिओ लसीच पेटंट हे जनतेच्या मालकीचं आहे असं जाहीर केलं आणि म्हणाला कि तुम्ही सूर्याचे पेटंट घेऊ शकता का? जणू ह्या क्रांतिकारी निर्णयामुळेच की काय आज जग पोलिओ निर्मूलनाच्या अगदी जवळ आहे...! (अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील काही रुग्णांचा अपवाद सोडला तर...!)


६ डिसेंबर १९५६ रोजी मा. नामदेवराव व्हटकर मुंबईतच होते... त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं... त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं... चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या... त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर "त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही" असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं... कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती... येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत... कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं... पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती... त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही...!

अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला... आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता...!? काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत... पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला... त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले... धावत - पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले... त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला... आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले...

बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले... एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली... पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला... यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत... सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं... याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली... चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं... त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं... बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला... चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आले...!

या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण २ हजार ८०० फूट रील संपली होती... दुसऱ्या दिवशी बाँबे फिल्म लॅबोरेटरीत ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली... आता ही फिल्म धुणे, दुसऱ्या पॉझिटिव्हवर रशप्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार खर्च येणार होता... त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहत घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले... पुढं या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवत्या आल्या नाहीत... त्यामुळे त्या कायमच्या गेल्या... मुंबई सोडावी लागली...!

(संदर्भ: नामदेवराव व्हटकर ह्यांचे आत्मचरित्र: कथा माझ्या जन्माची)

मालमत्ता गेली तर गेली... पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या, त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगांयुगासाठी कैद करता आलं, याच समाधान त्यांना होतं... आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणांची नामदेवराव व्हटकर ह्यांनी केलेली ही जगातील एकमेव चित्रफीत आहे... पण ह्या गोष्टींचं त्यांनी कधीही श्रेय घेतलं नाही किंवा भांडवल केलं नाही...! 


असो... ह्या तथाकथित पेटंटधारी जमातीच्या मंडळींकडून आपण नक्कीच ह्या थोर महापुरुषांसारख्या त्यागाची अपेक्षा तर सोडाच पण कल्पना देखील करु शकत नाही. पण तूर्तास एवढेच सांगणं आहे कि पुढच्या वेळेस जर चुकून कोणाकडून तुमची पोस्ट किंवा विचार तुम्हाला क्रेडिट न देता share झालेच तर कृपया नाण्याची दुसरी बाजू बघितल्यानंतरच तुमच्या बीभत्स वृत्तीच प्रदर्शन मांडा...! आणि तुमच्याकडुन जर का ह्या महापुरुषांचे विचार किंवा महापुरुषांबद्दलचे तुमचे विचार किंवा इतर काही साहित्यिक विचार वेगळ्या सृजनशीलतेने मांडता आले आणि इतर लोकांनी ते आवडीने तुम्हाला क्रेडिट न देता चुकून अजाणतेपणी share केले तर त्याला तुमचा परिचय देऊन दाद द्या... Trolling नाही...! 

धन्यवाद...!

दि. २६/०८/२०२२

© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

Comments

  1. अरे खुप छान लिहिलं सर! 🙌🏻 सुंदर पध्दतीने relation जोडल दोघांमध्ये!
    Also never heard about Namdeo Vhatkar and didn't even think about who shoot Mahaparinirvan video. Thanks for sharing 💙

    ReplyDelete
  2. अप्रतिम डॉ. प्रणित 👌

    ReplyDelete
  3. उत्तम भाई

    ReplyDelete
  4. उत्तम...सखोल विश्लेषण प्रणित👌
    Jonas Salk नामदेवराव व्हटकर❤️

    ReplyDelete
  5. Very nice 👍

    ReplyDelete
  6. खूप छान मित्रा 👍🙌

    ReplyDelete
  7. Informative...Chan lihatoyas ...lihat ja pranit

    ReplyDelete
  8. खुप छान लिहिले दाजी 👌👌

    ReplyDelete
  9. Bharich re doctor

    ReplyDelete
  10. Nice...keep it..Dr. Pranit..

    ReplyDelete
  11. Kharch chup chan...mitra..

    ReplyDelete
  12. अप्रतिम

    ReplyDelete
  13. डॉ. प्रणित वाह! खूपच छान!

    ReplyDelete
  14. अगदी बरोबर प्रणित...
    महत्त्वाचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहेस.
    👌👌👌

    ReplyDelete
  15. Khrach khup chan asa lekh ahe ki jenekarun kutuntari mahiti kivha vicharancha prasar karnyache apan kary karit ahat sir nahitr babasahebanche antyavidhi kiva tyanchya shevtchya athvani tipun tevnyachya nadat ekhad vyakti lakhyach fhakya banayla shanbhar vichar suddha karu shakat nahi to vyakti kiti mahan tharla pan ajpryant tyanchya karyach nav suddha tyani motepana mirvila nahi solute tyanchya karyala

    ReplyDelete
  16. अप्रतिम

    ReplyDelete
  17. Nice pranit...👌👌

    ReplyDelete
  18. खूप छान डॉक्टर प्रणित.. वास्तविकता आहे ती.. आजकाल कोणालाही श्रेय लाटायला खूप आवडतं चालय... आणि जर का ते त्यांच्या स्वतःच असेल आणि त्यांना श्रेय दिलं नसेल तर ही मंडळी पिसळल्यागत करते हे मात्र खर आहे.. तुमच्या विचारला शेअर केलं तर काय बिघडलं.. त्यातून त्यांनी काही आर्थिक लाभ तरी नाही ना मिळवला..
    एक चांगला विचार इतरांपर्यंत पोचावावा हाच तर एक प्रामाणिक प्रयत्न असताना तुम्ही जर का काही ही त्या व्यक्तीला बोलणार असाल.. तर काय अर्थ आहे त्या तुमच्या विचाराचा.. कवडी मोल असाल तुम्ही आणि तुमचे विचार सुद्धा..

    ReplyDelete
  19. खुप सुंदर...आजच्या आधुनिक जगाची वास्तविकता

    ReplyDelete
  20. Nice 👍 👍👍 keep it up

    ReplyDelete
  21. Nice 👌 👌,keep it up

    ReplyDelete
  22. धन्यवाद सर 💙🙏🙏🙏
    खूपच सुंदर विश्लेषण जी माहिती माहित नव्हती ती आज तुमच्या या लेखामुळे माहित पडली ❤👍🔥💙🙏🙏🙏

    ReplyDelete
  23. नामदेवराव व्हटकर यांचे कार्य महान आहे यात शंका नाही. पण, एखाद्याच्या विचारांना नावाशिवाय कॉपी-पेस्ट आणि शेअर करायला माझा नकार आहे. अजाणतेपणी झाले तर अपवादात्मक बाब म्हणून ठीक; पण विचारांचा मूळ उगम असणाऱ्या व्यक्तीचा अधिकारही मान्य व्हावा. लोकांना मूळ लेखक/शोधकर्ता माहिती असूनही त्यांनी त्यातील मूळ लेखकाचे नाव बदलून स्वतःच्या नावाने ते खपवायचे हे कोणत्याही सर्जनशील माणसाला मान्य होणार नाहीच. असे नसेल तर कॉपीराईट अस्तित्वातच आला नसता. (ट्रोलिंग वगैरे त्याने करावे की नाही हे प्रसंगानुरूप किंवा व्यक्ति-अनुरूप ठरेल.)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मैत्री-विवाह

Choose your Lady Wisely; She represents you! ('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)

शिवशक्ती आणि भिमशक्ती