Posts

गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो पेटून उठेल...!

"गुलामाला 'तु गुलाम आहेस' असे सांगा; म्हणजे तो बंड करून उठेल...!" #डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेबांनी जनता नावाचे पाक्षिक सुरू केले होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाला होता. त्याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे जनता पाक्षिकाचे संपादक झाले. जनता पाक्षिकाचे पुढे ३१ ऑक्टोबर १९३० ला 'जनता साप्ताहिक' झाले. साप्ताहिक जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून "गुलामाला 'तु गुलाम आहेस' असे सांगा; म्हणजे तो बंड करून उठेल" हे वाक्य होते. "आये मम्मे... हे काय आहे गं...? हे बघ ह्याच्यात काय लिहिलं...? तू शूद्र आहेस म्हणून लिहिलं...!" 'बह्याड' आहेस का गं...! काही पण बोलतं का? कुठे लिहिलं दाखव...? हे बघ...! हा... हा... हा... हा...!!! माय... हालकट कुठंच कि ते बामन... काही पण लिहिते की...? आपल्याच घरी येत जात राहते... खाते पिते अन् असं लिहिते की माझ्या कुंडलीत...? आन इकडे ती कुंडली...!  असं म्हणून माझ्या मम्मीने ती कुंडली टर्र टर्र फाडली... आणि माझ्या डोळ्यासमोरचं जाळ...

आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...?

आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...? In a famous 1955 interview with Jonas Salk, Edward Murrow asked who owned the polio vaccine patent. Jonas Salk's reply: “Well, the people, I would say. There is no patent. Could you patent the sun? बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईत ओसंडलेल्या ज्या प्रचंड जनसमुदायाची जी एकमेव कृष्णधवल चित्रफीत आपण आज बघतो ती कशी चित्रित झाली आणि कोणी केली असेल ह्याचा कोणालाच साधा विचारही आला नसेल. मलाही आला नव्हता. कधीच नाही...! परंतु काल फेसबुकवर संगम कांबळे सरांची दलित मित्र मा. नामदेवराव व्हटकर ह्यांच्याबद्दल एक पोस्ट वाचली. क्षणार्धातच डोळे पाणावले... आणि विचारांच एकच काहूर डोक्यात माजलं... आता निश्चितच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि पहिला English मधील जोनास साल्क ह्यांचा परिच्छेद आणि दुसरा बाबासाहेब व नामदेवराव व्हटकर ह्यांच्याबद्दलचा परिच्छेद ह्यात काय साधर्म्य आहे? किंवा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र मांडण्याचा काय संबंध? तर मुद्दा असा आहे कि आजकाल फेसबुकच्या आभासी समाजात (Virtual Society) एक तथाकथित (So Called) पेटंटधारी जमात तयार झाली आहे. ह्या...

मैत्री-विवाह

मैत्री-विवाह आज माझ्या आंतरजातीय मैत्री विवाहाला १ वर्ष पूर्ण झाली! होय मैत्री विवाहच...! मुद्दामच प्रेमविवाह हा जोडशब्द नाही लिहिला...! असो... ह्या मागील एका वर्षात बुद्ध-शिव-फुले-शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बऱ्याच गोष्टी बोलून-करून मला विचार करण्यास भाग पाडले! जसे की, प्रणितकडे किंवा माझ्या घरच्यांकडे लोकांचे बोलणे यायचे की, का तुम्ही दुसऱ्या जातीची मुलगी केली? सत्यशोधक विवाहच का केला? लग्नात नातेवाईकांचा मान-पान नाही केला! जोडा जमत नाही! न शोभणारी मुलगी केली! (मुळात मी लठ्ठ आहे!) नवरा डॉक्टर आहे तर मुलगी पण डॉक्टरचं करायला पाहिजे होती! न कमावती मुलगी केली... इत्यादी, इत्यादी! आणखी यादी बरीच मोठी आहे! या सर्व गोष्टी पाहता मला प्रश्न पडायला लागले की चांगले आचरण, निस्वार्थ मन ह्याला काहीच किंमत नाहीये का? (नातेवाईक आणि ते कोण असतात ते तिऱ्हाईत 4 लोक्स! त्यांच्यासाठी तर नाहीच असते वाटते!) लग्नानंतर बरेच जवळचे लोक मला म्हणायचे की थोडी बारीक हो... मला वाटायचं काळजीपोटी म्हणतात! (तसेही काळजीपोटी म्हणणारे आहेतकी म्हणा! नाहीत असे नाही!)...

शिवशक्ती आणि भिमशक्ती

 "शिवशक्ती आणि भिमशक्ती: महार(बौद्ध/नवबौध्द) व मराठा(कुणबी) समाजातील अंतर कायम ठेवून ब्राह्मणवादाला खतपाणी घालणारी कावेबाज संकल्पना" महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा व गैरमराठा खास करून महार समाजाचा किंवा शेड्युलकास्टचा नेता एकत्र आला की शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली असे म्हणण्याचा मूर्खपणा सर्रास चालु आहे. यामध्ये शिवशक्तीचा प्रतिनिधी मराठा नेता असतो व महार समाजाचा (शेड्युलकास्टचा) नेता भिमशक्तीचा प्रतिनिधी असतो. हा माहोल असा काही रंगवला जातो की पाहणाऱ्यास असे वाटते किंवा पटवून दिल्या जाते कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त मराठा लोकांसाठी फक्त मराठा लोकच बरोबर घेऊन काम केले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शेड्युलकास्टसाठी फक्त शेड्युलकास्टचेच लोक बरोबर घेऊन काम केले होते. एरव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे स्वराज्य निर्माण केले होते आणि बाबासाहेबांनी सर्वच भारतीयांसाठी संविधान लिहिले होते असे ओरडून सांगणारे पण या वातावरणात दिसेनासे होतात. हे सर्व पाहून एक भिषण प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे शिवशक्ती व भीमशक्ती मधे विभागलेला महाराष्ट्र फुले - शाहु - आंबे...

Choose your Lady Wisely; She represents you! ('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)

  Choose your Lady Wisely; She represents you!💞 ( 'व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...) एक साधारण कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्ती बराक ओबामा जेंव्हा पहिल्यांदा संयुक्त राज्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते... तेंव्हा संयुक्त राज्य अमेरिकेच्या पहिल्या महिला म्हणून त्यांच्या पत्नी मिशेल ओबामांचा त्यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध होत होता. आणि त्या फोटोसोबत एक वाक्य देखील सर्व सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये लिहून येत होते: Choose your Lady Wisely; She represents you! खरंय...! अपूर्वासोबत लग्नानंतर लगेच ह्या गोष्टीची अनुभूती मला झाली...! पण त्यापूर्वी मला ह्या वाक्याबद्दल फक्त थोडीफार समज होती कारण आमचा प्रेमविवाह!!! तोही आंतरजातीय! आणि एकदा ठोकर लागल्यावर तर माणूस ताकसुद्धा फुकून पीत असतो म्हणे! म्हणून लगेच वाचकाने ह्या लेखाच्या शिर्षकाचा अर्थ नकारात्मक घेऊ नये! नाहीतर आमच्या घरात भांडे वाजायला काही उशीर नाही! आणि तशी भांडी वाजायला पण हवीत म्हणा कारण ते म्हणतात ना " तुझं-माझं जमेना...अन तुझ्या वाचून करमेना! " असो... अपुर्वा संगिता विजय पोलासवार म्हणजेच माझी अप्पू...! माझी हमस...